8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. अनेकदा स्त्रिया स्वतःकडे दुर्लक्ष करून कुटुंबातील इतर व्यक्तींना, त्यांच्या गरजांना प्राधान्य देतात. त्यामुळे नकळत महिलांच्या आरोग्यापासून ते शैक्षणिक, करियरमधील प्रगती खुंटते. अनेकदा महिलांना त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांची पुरेशी माहिती नसल्याने नुकसान होते. म्हणूनच महिलांनो! तुमच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या काही महिलांना असलेल्या विशेष अधिकारांबद्दल वेळीच जाणून घ्या.